
सामना ऑनलाईन । मुंबई
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूरहून सीएसटीएमकडे येणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी उशीर झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. गाड्यांच्या उशीराबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

























































