उद्धव ठाकरे आज रायगडमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुहागर

रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी 6 वाजता शृंगारतळी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करणार असून या प्रचारसभेत ते काय बोलतात याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद गटाप्रमाणे महायुतीच्या पाच ठिकाणी प्रचारसभा घेण्यात आल्या असून आजच्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या सभेला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री महादेव जानकर, भाजपचे आमदार प्रसाद लाड, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीप बोरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार विनय नातू, शिवसेना-भाजप-रिपाइंचे पदाधिकारी या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत.

उद्या हातकणंगलेत प्रचार सभा

गुरुवार, 11 एप्रिल रोजी हातकणंगले येथील यल्लमा चौक, इस्लामपूर या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी 6 वाजता होणार असून या सभेलाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.