गोव्यात 19 मे रोजी पोटनिवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

माजी मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी विधानसभा जागेवर 19 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी याची घोषणा केली.

गोव्याबरोबर तामीळनाडू आणि कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणा यावेळी करण्यात आली. याबाबतचे परिपत्रक 22 एप्रिलला काढण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना नामांकनपत्र भरता येणार आहे. गोव्यात 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.