
सामना ऑनलाईन । सोनपेठ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांचे पुतणे माजी उपसभापती मदन भोसले यांचे नाव तालुक्यातील पीकविमा घोटाळ्यात आलेले. याबाबतच्या बातमीचा एका नामांकित चॅनेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून येत युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांना सोनपेठ शहरातील बसस्थानक परीसरात येऊन जिवे मारण्याची धमकी देत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच ‘नीट रहा नाहीतर संपवून टाकू’ अशा आशयाची धमकी देखील दिली. फिर्याद सोनपेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोलीस करत आहेत.































































