तुम्हाला देशात शांतता नकोय का? सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

तुम्हाला देशात शांतता नकोय का? लोकांनी शांततेत जगावे असे तुम्हाला वाटत नाही का? अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज याचिकाकर्त्यांना खडसावले. अयोध्येतील संबंधित जागेवर पूजाअर्चा करण्याची परवानगी मागणारी याचिका पंडित अमरनाथ मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना शेलक्या शब्दांत सुनावले आणि याचिकाच फेटाळून लावली.

यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टाने हीच याचिका फेटाळून लावत मिश्रा यांना पाच लाखांचा दंड ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश रद्द करण्यास नकार देत मिश्रा यांना हायकोर्टाने ठोठावलेला दंड कायम ठेवला.