काँग्रेस हा गाढवांचा पक्ष, प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सोलापूर

वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरमधील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली आहे. काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. सोलापूरमधील काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पंचतारांकित हॉटेलमधील भेटीचा फोटो समोर आला होता. याच फोटोवरून विविध चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असल्याने आंबेडकर यांनी टीका केली आहे.

Video सोलापुरात आंबेडकर-शिंदेंमध्ये टेबल पे चर्चा

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. सुशीलकुमार शिदे यांच्या भेटीवरुन काँग्रेस गाढवपणा करणार हे वाटलंच होते. भेटीचे राजकारण करणे काँग्रेसवाल्यांना चांगलेच जमते’, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. याआधी रविवारी प्रकाश आंबेडकर बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत नाश्ता करत असताना सुशीलकुमार शिंदे त्यावेळी तिथे पोहोचले होते. प्रकाश आंबेडकर हॉटेलमध्ये असल्याचं कळताच सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली होती.