
सामना ऑनलाईन । मुंबई
घरात पप्पी म्हणजेच कुत्र्याचे पिल्लू आणायचंय, गोंडस मनी हवेय.. . अजिबात काळजी करू नका. तुमच्या घरात परफेक्ट मॅच होईल असा पाळीव प्राणी शोधण्यासाठी टिंडेर हे ऍप तुमच्या मदतीला तयार आहे. टिंडरने ‘पॉ’ फेक्टमॅच हा उपक्रम सुरू केला असून त्याला प्राणीप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
कुत्रा, मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांना जास्तीत जास्त लोकांनी दत्तक घ्यावे, या उद्देशाने टिंडरने मुंबई, पुणे, दिल्ली येथील प्राणीपेमी संघटनांबरोबर भागीदारी केली आहे. यामध्ये मुंबईतील वर्ल्ड फॉर ऑल ऑनिमल केअर अँड ऍडोप्शन ही संस्था आहे.
टिंडेर ऍप प्रत्येक पाळीव प्राण्यांची माहिती छायाचित्रांसह अपडेट करण्यात आली आहे. युजर्सने आपल्याला कोणत्या प्रकारचे पेट हवेत याची माहिती द्यायची आणि संपर्क नंबर नोंदवायचा आहे.



























































