5 दिवसांत कमावले 250 कोटी; ‘ऍव्हेंजर्स एंडगेम’ची घौडदौड सुरूच 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मार्व्हल्स सिनेमाच्या ‘ऍव्हेंजर्स एंडगेम’ने अवघ्या 5 दिवसांत हिंदुस्थानात 250 कोटी रुपयांची घसघशीत कमाई करत हिंदुस्थानातले आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. ऍव्हेंजर्सच्या भीतीने 10 मेपर्यंत बॉलीवूडचा कोणताही बडा सिनेमा रिलीज होणार नसल्याने दुसऱ्या आठवडय़ातही ऍव्हेंजर्सला फायदा होणार आहे.

‘ऍव्हेंजर्स एंडगेम’ची क्रेझ जगभरात असल्याने या सिनेमासोबत मराठीतला ‘कागर’ वगळता बॉलीवूडमधला कोणताही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. या आठवडय़ात ‘सेटर्स’, ‘ब्लॅक’ आणि ‘1978’ हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. मात्र ऍव्हेंजर्सचे वादळ हे सिनेमे कितपत रोखू शकतील हा प्रश्नच आहे. 10 मे रोजी करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ दि एयर 2’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. हा सिनेमा ऍव्हेंजर्सची कमाई रोखण्यासाठी स्पीड ब्रेकर ठरेल, असे सिनेविश्लेषकांचे म्हणणे आहे.