
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील क्रमांक चारच्या प्लॅटफॉर्मवर एका एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला आहे. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवल्या आहेत ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. तसेच एक्सप्रेसच्या मागून येणारी आसनगाव जलद लोकल खोळंबल्याने त्यातील प्रवाशांना पायपीट करून दादर स्थानक गाठावे लागले.
चार क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून डाऊनच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल थांबतात. मात्र आता एक्सप्रेस त्या मार्गावर खोळंबली असल्याने ऑफिस सुटण्याच्या या गर्दीच्या वेळेत जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. या गोंधळामुळे धीम्या मार्गावरील वाहतूकीला देखील फटका बसला असून दादर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

























































