
सामना ऑनलाईन । लखनौ
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी 72 तासांची प्रचारबंदी भोगावे लागलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही बजावली आहे. याप्रकरणी त्यांना 24 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले होते जेव्हा मी खासदार होतो तेव्हा सपा-बसपाच्या खासदाराला त्यांच्या पूर्वजांबद्दल विचारले होते तेव्हा त्यांनी आपण बाबर यांचे उत्तराधिकारी असल्याचे म्हटले होते. एका बाजूला असा उमेदवार आहे जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो तर दुसरीकडे विरोधी पक्षाचा असा उमेदवार आहे जो स्वतःला बाबरची औलाद म्हणतो. जी व्यक्ती वंदे मातरम् म्हणत नाही ती व्यक्ती मत मिळवण्याच्या लायकीची नाही असे आदित्यनाथ यांनी म्हटले होते.



























































