
सामना ऑनलाईन, ठाणे
मेट्रो चारच्या खोदकामादरम्यान जमिनीखालून गेलेल्या जलवाहिन्या हटवण्याचे लवकरच काम हाती घेतले जाणार असल्याने घोडबंदर रोड आणखीनच जाम होणार आहे. आधीच मेट्रो चारच्या खोदकामामुळे घोडबंदर रोडवर मेगा कोंडी होत असतानाच येथील खोदकामात भर पडणार असल्याने ठाणेकरांची लटकंती होणार आहे. त्यामुळे जलवाहिन्यांचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे निर्देश वाहतूक शाखेने एमएमआरडीला दिल्याने वाहनचालकांना या कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
वडाळा-ठाणे-कासारवडवली या मेट्रो चार प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यासाठी खोदलेला घोडबंदर रोड आणि बॅरिकेड्समधून मार्ग काढताना चालकांची पुरेवाट लागते. त्यातच विरुद्ध दिशेने वाहने रेटणाऱया चालकांमुळे घोडबंदर रोड आणि आजूबाजूच्या सर्क्हिस रोडकर ऐन गर्दीच्या वेळी तासन्तास कोंडी होते. त्यातच लुईसवाडी ते कापूरबाकडी जंक्शनपर्यंत पूर्व द्रुतगती महामार्गाच्या खालून गेलेल्या जलवाहिन्या मेट्रोच्या कामासाठी कायमच्या हलवण्यात येणार आहेत. त्यासाठी मोठमोठी यंत्रे या भागात आणली जाणार असून त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडणार आहे. या कोंडीवर उपाय म्हणून वाहतूक शाखेने हे काम तीन टप्प्यांत करण्याच्या सूचना एमएमआरडीएला दिल्या असून त्यानुसार पुढील एक ते दीड महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.
पाणीपुरवठय़ावर परिणाम नाही
मेट्रोच्या कामादरम्यान अडथळा ठरणाऱया जलवाहिन्या हटकताना शहरातील पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम होणार नाही. याउलट भविष्यात जुन्या जलवाहिन्या बदलल्यानंतर ठाणेकरांना अधिक चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितले.






























































