
सामना प्रतिनिधी । परभणी
पूर्णा तालुक्याताील तालुका कृषी अधिकारी एच.आर. तांबीले यांना रविवारी त्यांच्या राहत्या घरी दोन इसमांनी मारहाण केली. याप्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनात कृषी विभगामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सुक्ष्म सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. त्या अनुषंगाने वितरकांच्या मार्फत काम करणारे हरिष वंजे यांनी शेतकऱ्यांच्या नावे ठिबक सिंचनाचे 43 बोगस प्रस्ताव तयार करुन त्यांचे अनुदान वितरण करण्यासाठी प्रस्ताव कार्यालयात दाखल केले. या प्रस्तावाची मोका तपासणी करण्यासाठी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना दिले असता संबंधीत ठिकाणी नॉन स्टँडर्ड मटेरियल अनुदानास अपात्र असलेले साहित्य आढळून आले. दरम्यान, त्या संचाचे अनुदान काढण्यासाठी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना हरिष वंजे धमकावत होता. ऐवढेच नव्हे तर क्षेत्रिय कर्मचाऱ्यांच्या घरापर्यंत जावून अनुदान काढण्यासाठी कृषी पर्यवेक्षक एस.एम. मस्के, कृषी सहाय्यक बी.जी. मस्के, कृष्ज्ञी पर्यवेक्षक डी.एस. तिडके व कृषी सहाय्यक एस.बी. शिंदे यांच्यावर दबाव आणत असे. या प्रस्तावाची सत्यता तपासण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आर.एच.तांबीले, मंडळ कृषी अधिकारी एस.एम. वाघमोडे तसेच कृषी पर्यवेक्षक डी.एस. तिडके, कृषी सहाय्यक आर.एम. भराड, व बी.जी. मस्के यांनी 15 प्रस्तावाची तपासणी केली. या तपासणीमध्ये प्रस्ताव अनुदानास अपात्र आढळून आले. त्यामुळे हे प्रस्ताव ठिबक सिंचन प्रणालीमधून रद्द करण्याची शिफारस केली, अशी माहिती हरिष वंजे यांना कळाताच त्यांनी ‘माझेच प्रस्ताव का तपासले’, असे म्हणत तांबीले यांना फोनवरुन धमकाविले आणि तुम्ही कोठे आहात, असे विचारत होता. त्यानंतर तांबीले यांनी कटाळून फोन बंद केला. तांबीले यांच्या मुलीच्या फोनचा शोध घेऊन तांबीले यांच्या लोकशनबाबत चौकशी केली.
रविवारी सकाळी एम.एच.26 बी.सी. 6955 या वाहनातून दोन इसम तोंडास रुमाल बांधून तांबीले यांना मारहाण करुन वाहनातून निघून गेले. या गुन्ह्यातील आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अन्यथा कृषी अधिकारी असहकार आंदोलन करुन कामावर बहिष्कार टाकतील, असा इशारा दिला. या निवेदनावर जिल्हा अधिक्षक कृषीचे व्ही.व्ही. पाटील, एस.बी. खरकाळे, आर.एच. तांबीले, कृषी अधिकारी वैâलास गायकवाड, एस.पी. काळे, बी.एस. रुपणर, सु.वि. मस्के, एस.एच. पवार, एस.बी. चव्हाण, पी.बी. बनसावडे, जी.ए. कोरेवाड, डी.व्ही. नागुरे, बी.एम. कच्छवे, वि.मा. देशमुख, आर.एम. येरेवार, आर.एस. जोशी, एस.बी. भीसे, पी.एस. पामे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.































































