ठंडे ठंडे पानी मे…;उकाडय़ामुळे बसंती आणि यशचे पाणवठय़ातच बस्तान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतला उकाडा आता असह्य व्हायला लागला आहे. उन्हाचे चटके तर बसत आहेतच, पण घामाच्या धाराही वाहत आहेत. या उकाडय़ाने प्राण्यांनाही सोडलेले नाही. नॅशनल पार्कमधील बसंती, यश या वाघांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठय़ात हे वाघ दिवसभरातून चार वेळा डुंबत आहेत. जवळपास तास ते दोन तास पाण्यातच बस्तान मांडत असल्याचे नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाघांच्या पिंजऱ्यातही सातत्याने पाणी मारण्यात येत आहे. दर उन्हाळय़ात त्यांना थंडावा मिळावा यासाठी त्यांची खास बडदास्त राखली जाते. उन्हाळय़ामुळे हे वाघही त्रस्त होतात आणि पिंजऱ्यातही सातत्याने येरझऱ्या घालतात. त्यामुळे त्यांच्यासाठी खास पाणवठे तयार करण्यात आले आहे. या पाणवठय़ांमध्ये दिवसभरात चार वेळा बसंती आणि यश यांना डुंबायला आवडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.