पाझर तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। शिरुर ताजबंद

येथील उदगीर रोडवरील येणुरे यांच्या शेताजवळील पाझर तलावात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या जवळ ओळखीचा कसलाच पुरावा नाही. यामुळे हा मृतदेह शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ओळखीसाठी ठेवण्यात आले आहे.

तरी ही व्यक्ती कोणाचा नातेवाईक किंवा कोणाच्या ओळखीचा असल्यास त्यांनी अहमदपूर पोलिसांशी संपर्क करावा. 8 मे 2019 रोजी कोरड्या तलावात हा मृतदेह सापडला आहे. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट, पांढरी धोती असून डोक्याखाली उन्हाळी मोठा रुमाल आहे.