
सामना प्रतिनिधी। मुंबई
लहान मुलांचे सर्वाधिक पसंतीचे चॅनेल असलेल्या कार्टून नेटवर्कवर 16 देशांमध्ये तीन दिवस अश्लील व्हिडीओ दिसत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्राझीलमधील दोन हॅकर्सनी कार्टूनची वेबसाइट हॅक करून हा प्रताप केला होता.
हॅकर्सनी कार्टून नेटवर्कचे आफ्रिका, अरब, ब्राझील, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, जर्मनी, हंगेरी, इटली, मेक्सिको, नेदरलँड, नॉर्के, पोलंड, रोमानिया, रशिया आणि तुर्कीमध्ये कार्टून नेटकर्क हॅक केले होते. याबाबतचा खुलासा गेल्या 25 एप्रिलला झाला आहे. नेटवर्क हॅक केल्यानंतर हॅकर्सनी या वेबसाइटकरून अरेबिक मीम्स, ब्राझीलियन हिप-हॉप सॉन्गसह ब्राझीलियन मेल स्ट्रिपर्स व्हिडीओही दाखविले होते. कार्टून नेटवर्कवर अश्लील व्हिडीओ पाहून पालकही संताप व्यक्त करत होते. दरम्यान, कंपनीने हॅक झालेली वेबसाइट बंद करून दुसरी वेबसाइट दिली आहे.































































