
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱया भाजपच्या बडबडय़ा नेत्यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. आपल्या वक्तव्याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली असली तरीही त्यांना समर्थन देणारे भाजप नेते अनंत कुमार आणि खासदार नलीन पाटील यांनी साध्वी यांची बाजू लावून धरत त्यांचे समर्थन केले. तर अनिल सौमित्र यांनी महात्मा गांधी हिंदुस्थानचे नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते असे वक्तव्य केले. या नेत्यांच्या विधानांची गंभीर दखल घेत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून पक्षाच्या शिस्तपालन समितीने त्यांना त्यांच्या विधानांबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले असून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्या विधानांशी पक्षाचा काहीही संबंध नसून ही संबंधित नेत्यांची वैयक्तिक विधाने असल्याचे म्हटले आहे.
भाजपची शिस्तपालन समिती घेणार निर्णय
साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे यासंदर्भात करण्यात आलेली सर्व वक्तव्ये पाठवण्यात आली आहेत. यावर उत्तर देण्यासाठी प्रज्ञासिंह यांना दहा दिवसांचा कालावधी देण्यात आहे. भाजपची शिस्तपालन समिती यावर काय तो निर्णय करेल, असे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले. भगव्या दहशतवादासंदर्भात देशभरात पसरवली जाणारी खोटी माहिती आणि केला जाणारा खोटा प्रचार याविरोधात आम्ही सत्याग्रह करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. देशाच्या न्यायालयानेही भगवा दहशतवाद खोटा असल्याचे मान्य केले आहे. भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग काँग्रेसकडून करण्यात आला असून याबाबत काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागावी, असे शहा म्हणाले.
राजीव गांधी 17 हजार जणांच्या मृत्यूला जबाबदार
नथुराम गोडसेने एकाला मारले. कसाबने 72 जणांची हत्या केली. परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी हे 17 हजार जणांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार नलीन काटील यांनी केले आहे. आता तुम्हीच ठरवा अधिक क्रूर कोण असेही त्यांनी म्हटले आहे. ट्विटरवरून त्यांनी असे वक्तव्य केले. सोशल मीडियावरून त्यांच्या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर लगेचच त्यांनी हे ट्विट हटवले आणि आता चर्चा इथेच थांबवूया असे ट्विटही केले.
महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता भाजप नेत्याची मुक्ताफळे
महात्मा गांधी हे हिंदुस्थानचे नक्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते असे बेताल वक्तक्य करत भाजप नेते अनिल सौमित्र यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले. या वक्तव्यानंतर भाजपने लगेच त्यांना पक्षातून निलंबित करत सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले आहेत. सौमित्र यांनी शुक्रकारी फेसबुककर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी महात्मा गांधीजींना उद्देशून म्हटले की, ते राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे. हिंदुस्थानात तर त्यांच्यासारखे कोटय़वधी पुत्र होऊन गेले. काही लायक होते तर काही नालायक याची गंभीर दखल घेत भाजपने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
अनंतकुमार हेगडे म्हणतात ट्टिवटर अकाऊंट हॅक झाले
केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सात दशकांनंतर सध्याची पिढी एका बदललेल्या वैचारिक वातावरणात गोडसेबाबत चर्चा करत आहे. ही चर्चा पाहून गोडसेलाही आनंद झाला असेल, असे टि्वट करत साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याच समर्थन केले. याबाबत पक्षाने नोटीस बजावताच हेगडे यांनी घूमजाव केले. माझे ट्किटर अकाऊंट गुरुकारपासून हॅक झाले होते. महात्मा गांधीजींच्या हत्येचे कधीच समर्थन करता येणार नाही आणि त्यांच्या मारेकऱयांविषयी सहानुभूती दाखवणे चुकीचे असल्याचे हेगडे यांनी म्हटले आहे.




























































