
सामना प्रतिनिधी । मुंबई
पदवी प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी 33 हजार 944 अर्ज आले आहेत. 29 मेपासून मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी सुरू केली असून गुरुवारी दुसऱया दिवशी 28 हजार 181 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने ऑनलाईन चॅटबोट, व्हिडीओ टय़ुटोरिअल आणि हेल्पलाइनची व्यवस्था केली आहे. अर्ज भरताना अडचणी आल्यास 66834821 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
विद्यापीठातर्फे प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम., बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बी.कॉम. (फायनान्शिअल मार्केट), बी.कॉम. (अकाऊंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुअरन्स), बी.कॉम. (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बी.कॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बी.कॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बी.एस्सी. (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बी.एस्सी (कम्प्युटर सायन्स), बी.एस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बी.एस्सी (मायक्रोबायोलॉजी), बी.एस्सी (बायो-केमेस्ट्री), बी.एस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बी.एस्सी (मेरिटाइम), बी.एस्सी (नॉटिकल सायन्स), बी.एस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बी.एस्सी (होम सायन्स), बी.एस्सी (एरॉनॉटिक्स), बी.एस्सी (एव्हीएशन), बी.एस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी सुरू आहे, अशी माहिती कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दिली.




























































