
सामना प्रतिनिधी । ठाणे
श्रीलंकेत भीषण स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांची संशयित बोट पालघरच्या समुद्रात असल्याचा इशारा तटरक्षक दलाकडून देण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून अॅलर्ट मिळाल्यानंतर याभागातील सुरक्षा, पोलिसांची गस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
स्थानिक पोलीस यंत्रणेने शोध मोहीम सुरू केली असून संशयित बोट अद्याप आढळली नसल्याचे समोर आले आहे. 4 स्पीड बोटींद्वारे शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे समजते.

































































