
सामना ऑनलाईन । बंगळुरू
बंगळुरूमध्ये प्रसिद्ध मिळवण्यासाठी चौघांनी एका 25 वर्षीय व्यक्तीवर चौकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर कलम 307 आणि 341 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हल्ला केल्यानंतर चौघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
‘बंगळुरू मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित नईम उल्ला खान हा होसागुद्दैहल्ली येथील रहिवासी आहे. 2 जून रोजी सकाळी 6 वाजता नमाज अदा करून परत येत असताना चौघांनी त्याची दुचाकी थांबवली आणि त्याच्यावर चाकून हल्ला केला. यावेळी नईमची त्यांच्यासोबत झटापट झाली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जखमी नईम याच्यावर व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित व्यक्तीचा एक भाऊ मोबाईल दुकान चालवतो. त्याने सांगितले की, या भागात भावाचे चांगले वजन असून त्याचे कोणाशाही वाद नाहीत. हल्ला केलले लोक को आहेत आणि त्यांना हा हल्ला का केला याची माहिती नाही. कारण व्यवसायानिमित्त त्याची अनेकांशी भेट होत असते. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यामागे जुना वाद असल्याची शक्यता आहे. या भागातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत झाले असून लवकरच आरोपींना अटक करण्यात यस येईल.





















































