उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याचे मुख्यमंत्री योगींकडून स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी अयोध्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले आहे. खासदार संजय राऊत यांनी योगींची भेट आज भेटली तेव्हा त्यांनी या दौर्‍याचे स्वागत केले.

सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 16 जून रोजी अयोध्याचा दौरा करतील, या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आदित्यनाथ यांची भेट घेतली. ही भेट सकारात्मक झाल्याचे राऊत यांनी म्हटले, तसेच योगी यांनी उद्धव ठाकरे यांचे यात्रेसाठी स्वागत केल्याचेही राऊत यांनी नमूद केले. या दौर्‍यासाठी लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.