दोन वर्षांत मिठी नदीचा चेहरामोहरा बदलणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबईतील मिठी नदीच्या संवर्धनाचे व सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे. सुमारे 2136 कोटी रुपये खर्च करून मिठी नदीच्या संवर्धनाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होईल. त्यानंतर मिठी नदीचा चेहरामोहराच बदलला जाईल, असा विश्वास पर्यावरणमंत्री रामदास कदम व शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला. मिठी नदीच्या जोडीने मुंबईतल्या पोयसर, ओशिवरा आदी नद्यांचेही संवर्धन होईल. राज्यातल्या इतर 20 नद्यांचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारकडे सहा हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कुलाबा येथील ताजमहाल हॉटेलमध्ये ‘शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक दळणवळण’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या परिषदेच्या निमित्ताने पर्यावरणमंत्री रामदास कदम व शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिठी नदी तसेच पोयसर, ओशिवरा, दहिसर व वालभाट नद्यांचे संवर्धन व सुशोभीकरण विषयावर पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबईतील 26 जुलैच्या
प्रलयकारी पावसानंतर चितळे समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण व सुशोभीकरणाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर पालिका व एमएमआरडीएच्या माध्यमातून आखण्यात आला आहे. सुमारे 18 कि.मी. लांबीच्या नदीच्या संवर्धनावर आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती यावेळी सादर केली.

आदित्य ठाकरेंचा पाठपुरावा
मुंबईतल्या नद्यांच्या खासकरून मिठी नदीच्या संवर्धनासाठी व सुशोभीकरणासाठी आदित्य ठाकरे सतत पाठपुरावा करीत होते. मिठी नदीच्या रुंदीकरणाबाबत व इतर कामांबाबत सतत विचारणा करीत होते, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सुरुवातीला आवर्जून सांगितले.

रुंदीकरण आणि खोलीकरण
मिठी नदीच्या पात्राचे पाच मीटरपासून काही भागांत अगदी वीस मीटरपर्यंत रुंदीकरण झाले आहे. काही ठिकाणी मिठी नदीचे पात्र सात फुटांपर्यंत खोल करण्यात आले आहे.

सर्वांच्या सहकार्याची गरज
मिठी नदीची स्वच्छता, रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व महापालिका अशा वेगवेगळय़ा 16 एजन्सीच्या समन्वयातून हा कार्यक्रम आखला आहे. पण त्यासाठी सर्वांच्याच सहकार्याची गरज आहे. मिठी तसेच मुंबईतील इतर नद्यांची स्वच्छता महत्त्वाची आहेच, पण कचरा फेकू नये यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, असे शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

सायकल ट्रक ते जलप्रवास
मिठी नदीच्या काठावर जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक बांधण्याची योजना आहे. मिठी नदीत सोडण्यात येणाऱया पाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्र (एसटीपी) बांधण्यात येणार आहेत. प्रक्रिया केंद्रातील स्वच्छ पाणी झाडांच्या व इतर वापरासाठी उपयोगात आणायचे अथवा स्वच्छ पाणी पुन्हा नदीत सोडायचे याची चाचपणी करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले की, मिठी नदीच्या तीरावर अनधिकृत दुकाने व भंगारवाले होते. मागील पाच वर्षांत 4 हजार 388 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, विमानतळाच्या धावपट्टीच्या खालून काढलेला मार्ग यामुळे मिठी नदीच्या संवर्धनाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल.

मिठी नदीवरचा एकूण खर्च –
2 हजार 136 कोटी 89 लाख
आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांवरचा खर्च – 1 हजार 156 कोटी 75 लाख
पाच पुलांचे बांधकाम पूर्ण झाले.
 एमटीएनएल पूल, कुर्ला  लाठीया रबर पूल, कुर्ला  क्रांतिनगर पूल, कुर्ला  अशोक नगर पूल, मरोळ, कुर्ला  बामन दायापाडा पूल, अंधेरी

चार पुलांचे बांधकाम प्रस्तावित
 सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्ता, वाकोला
 माहीम कॉजवे पूल, माहीम
 तानसा पाइपलाइन पूल, माहीम
 वैतरणा पाईपलाईन पूल, वांद्रे

रुंदीकरण आणि खोलीकरण
मिठी नदीच्या पात्राचे पाच मीटरपासून काही भागांत अगदी वीस मीटरपर्यंत रुंदीकरण झाले आहे. काही ठिकाणी मिठी नदीचे पात्र सात फुटांपर्यंत खोल करण्यात आले आहे.

सायकल ट्रॅक
मिठी नदीच्या काठावर जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक बांधण्याची योजना आहे. मिठी नदीत सोडण्यात येणाऱया पाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्र (एसटीपी) बांधण्यात येणार आहेत. प्रक्रिया केंद्रातील स्वच्छ पाणी झाडांच्या व इतर वापरासाठी उपयोगात आणायचे अथवा स्वच्छ पाणी पुन्हा नदीत सोडायचे याची चाचपणी करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

सर्वांच्या सहकार्याची गरज
मिठी नदीची स्वच्छता, रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व महापालिका अशा वेगवेगळय़ा 16 एजन्सीच्या समन्वयातून हा कार्यक्रम आखला आहे. पण त्यासाठी सर्वांच्याच सहकार्याची गरज आहे. मिठी तसेच मुंबईतील इतर नद्यांची स्वच्छता महत्त्वाची आहेच, पण कचरा फेकू नये यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, असे शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचा पाठपुरावा
मुंबईतल्या नद्यांच्या खासकरून मिठी नदीच्या संवर्धनासाठी व सुशोभीकरणासाठी आदित्य ठाकरे सतत पाठपुरावा करीत होते. मिठी नदीच्या रुंदीकरणाबाबत व इतर कामांबाबत सतत विचारणा करीत होते, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सुरुवातीला आवर्जून सांगितले.

‘शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक दळणवळण’ या विषयावरील कार्यशाळेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम सहभागी झाले होते.