
सामना प्रतिनिधी। पुणे
सहाय्यक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) यंदा 20 ते 28 जूनदरम्यान होणार आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ही परीक्षा आयोजित करण्यात येते. या परीक्षेसाठी 1 ते 30 मार्च या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा आता चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. ‘एनटीए’मार्फत एकूण 84 विषयांसाठी 91 ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी घेण्यात येणारी नेट परीक्षा दोन सत्रात होईल. पहिले सत्र 9.30 ते 12.30 तर दुसरे सत्र 2.30 ते 5.30 या वेळेत होईल.

























































