
सामना प्रतिनिधी । मुंबई
आदिवासी विद्यार्थ्यांचे शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे 49 कोटी 70 लाख 89 हजार 200 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी आज येथे दिली.
उईके म्हणाले, सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात अपर आयुक्त, नाशिक, ठाणे विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळा तसेच अमरावती विभागातील काही प्रकल्पातील शाळा दिनांक 17 जून रोजी सुरु झाल्या असून शाळा सुरु झाल्याच्या दिनांकापासुन प्रवेश नुतनिकरण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर आयुक्तालयामार्फत डिबीटीची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक 21 जून पर्यंत एकूण 1 लाख 3 हजार 194 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 49 कोटी 70 लाख 89 हजार 200 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.




























































