
सामना प्रतिनिधी। परूळे
परूळे ग्रामपंचायत सदस्या मनिषा नेवाळकर यांनी पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत रविवारी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. सावंतवाडी येथे ना.केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात नेवाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करीत शिवबंधन हाती बांधले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनिल म्हापणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, परूळे उपसरपंच विजय घोलेकर, उमेष नेवाळकर, उदय दाभोलकर, सत्यवान नेवाळकर, रोहीत म्हापणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परूळे ग्रामपंचायतमध्ये सेनेचे सदस्य संख्याबळ आता सात झाले आहे.


































































