रत्नागिरीत दुचाकी-कार अपघातात एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीत फिनोलेक्स कॉलेज जवळील रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या दुचाकी व चारचाकी गाडीच्या अपघातात एका तरुण ठार झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरून आपल्या घरी जाणाऱ्या या तरुणांना मर्सिडीज गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाला.

एमआयडीसी मधील जीएफ कंपनी मधून आपल्या कामावरून रुपेश सुरेश मालप (27) रा. निवळी व सुरेंद्र शिवाजी गावडे (27) रा. निवळी हे दुचाकीवरून आपल्या घरी परतत होते. यावेळी दुसऱ्या रस्त्याने तुफान वेगात येणाऱ्या मर्सिडीज गाडीची जोरदार धडक या दोघांना बसली. या धडकेत रुपेश सुरेश मालप हा तरुण जागीच ठार झाला तर जखमी सुरेंद्र शिवाजी गावडे याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले.