घरे महागणार, सिमेंटच्या दरात होणार वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात सिमेंटच्या किमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण नसल्याची कबुली राज्य सरकारने आज विधान परिषदेत दिली. त्यामुळे सिमेंटचे दर वाढण्याची शक्यता असून घरांच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात सिमेंट बॅगचे दर एप्रिल महिन्यात प्रतिबॅग 320 ते 350 रुपयांपर्यंत गेले होते. याबाबत गिरीशचंद्र व्यास, अनिल सोले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या उत्तरात संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केंद्र शासनाने सिमेंटचे उत्पादन, किंमत आणि वितरण यावरील निर्बंध काढून टाकले आहेत. महाराष्ट्र सिमेंट (नियंत्रण) आदेश 1990 च्या अधिसूचनेद्वारे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत सिमेंटच्या किमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण नसल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.