टिकटॉकने हटवले ‘ते’ 60 लाख व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tiktok-f

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आणि तेवढेच वादाच्या भोवऱयात सापडलेल्या टिकटॉकने आपल्या प्लॅटफॉमवरून 60 लाखांहून अधिक व्हिडीओ हटवले आहेत. हे व्हिडीओ कंटेंट गाइडलाइनचे उल्लंघन करणारे होते. हटकलेल्या व्हिडीओंमध्ये जुलै 2018 पासून आतापर्यंतच्या व्हिडीओंचा समावेश आहे.

टिकटॉवकरील बेकायदेशीर आणि अश्लील मजकुराला आळा बसावा, यासाठी आम्ही व्यवस्था मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहोत, असे टिकटॉक कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले. हिंदुस्थानात टिकटॉकचा विरोध काढत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नोटीस पाठकून टिकटॉककडे जवळपास काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. यातील बहुतांश प्रश्न लहान मुलांच्या अश्लील व्हिडीओ आणि देशविरोधी व्हिडीओबाबत होते.