
सामना प्रतिनिधी । गडचिरोली
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल नेत्यांसह अनेक जहाल नक्षल्यानी नजीकच्या काळात आत्मसमर्पण केले आहे.
पोलीस दलाने नर्मदाक्कासारख्या वरिष्ठ नक्षलीला केलेली अटक यामुळे नक्षली मोठया संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. याच मालिकेत गडचिरोली पोलिसांपुढे आज 32 लाख 50 हजार रुपये बक्षीस असलेल्या 6 जहाल नक्षल्यानी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांच्या विरोधात आतापर्यंत केलेली उत्कृष्ट कामगिरी तसेच विकासाच्या विविध योजना राबवून जनतेचा विश्वास संपादन केल्यामुळे नक्षली मोठया प्रमाणात आत्मसमर्पण करीत आहेत.
























































