
सामना ऑनलाईन । लंडन
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या किताबी लढतीत इंग्लंडला जगज्जेतेपदाचा करंडक जिंकून देण्यात बहुमोल योगदान देणाऱ्या बेन स्टोक्सला इंग्लंड संघाच्या उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेसाठी शनिवारी 14 सदस्यीय इंग्लंड संघाची घोषणा केली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेल्या जोफ्रा आर्चरलाही इंग्लंडच्या ऍशेस संघात स्थान देण्यात आले असून यानिमित्ताने तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
इंग्लंडचा संघ : जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स ऍण्डरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ऑली स्टोनस, ख्रिस वोक्स.
























































