वॉटर ग्रीड प्रकल्प संपूर्ण मराठवाड्यात होणार, दिशाभूल करू नका! क्षीरसागरांचा विरोधकांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

वॉटर ग्रीड योजनेतून बीड जिल्ह्याला वगळले नाही, गैरसमज निर्माण होऊ देऊ नका दोन दिवसांपूर्वी अहवाल सादर झाला आहे. मराठवाड्यात सर्व जिल्हे या प्रकल्पात येणार आहेत 11 प्रकल्प राबवले जाणार आहे. लोखंडी पाईप द्वारे वॉटर ग्रीड जोडले जाणार आहे. आंध्रप्रदेश मध्ये वाहून जाणारे पाणी ही मराठवाड्यात आणि खान्देशात सोडले जाणार आहे. या प्रकल्पाबाबत आम्ही सर्व गांभीर्याने घेत आहोत, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.

बीड शहराचे ग्राम दैवत असणारे खंडेश्वरी देवी मंदिराच्या पाच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचा लोकार्पण अन वृक्षरोपन सोहळा आज रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला. सत्यनारायण लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक , योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला

या वेळी बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड शहरातील रस्त्याचे आराखडे मोठ्या प्रमाणात आखले आहेत. मोकळा श्वास घेता यावा यासाठी 23 छोट्या बाग, ओपन जिम चे काम हाती घेत आहोत. थोड्या ओव्हरमध्ये जास्त धावा काढायच्या आहेत, मला संधी मिळाली या संधीचे सोने करायचे आहे. एकीकडे काही भागात पावसाने हाहाकार उडवला आहे तर दुसरीकडे आपल्या भागात पिण्यासाठी पाणी नाही, यामुळे स्थलांतर होत आहे. 2 टक्के लोकांनी स्थलांतर केल्याचे समोर आले आहे. वॉटर ग्रीड मधून बीड जिल्ह्याला वगळले नाही. बीड जिल्ह्याचा प्रकल्प अहवाल राज्यसरकार ला परवा मिळाला आहे. दोन जिल्ह्याला मान्यता मिळाली असून उर्वरित सात जिल्ह्याला लवकर मान्यता दिली जाईल. मराठवाड्यात अकरा प्रकल्प होणार आहेत. लोखंडी पाईप द्वारे वॉटर ग्रीड प्रकल्प राबवले जाणार आहेत. यात पिण्याच्या पाण्यासाठी, शेती साठी उद्योगासाठी पाणी पुरवले जाणार आहे, आंध्रप्रदेश मध्ये जे पाणी वाहून जाते ते उचलून मराठवाडा आणि खानदेश भागात सोडले जाणार आहे. पाणी आग विझवण्यासाठी लागते, मात्र पाण्यामुळे वाद पेटत आहेत आपण हे वाद होऊ देणार नाही. 50 कोटी रुपये खर्चात 12 टी एम सी पाणी आणले जाणार आहे, असे ते म्हणाले.