
<<क्षितिज झारापकर
अलका कुबल. खास स्वतःचा असा स्त्री प्रेक्षकवर्ग त्या अजूनही जपत आता हसण्या – हरविण्याच्या वाटेवर निघाल्या आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत जेव्हा सचिन, लक्ष्या अणि अशोक सराफ हे बाहुबली ठरत होते; तेव्हाच एक वेगळय़ा साम्राज्याची देवसेना त्यांना पूरुन उरली होती. विनोदाच्या चौफेर आतषबाजीला अंतःकरण पिळवटून शह देणारी अलका कुबल.
महाराष्ट्राच्या जनतेला, विशेषतः स्त्राrवर्गाला ‘माहेरची साडी’मधून कदाचित माझ्यात इन्स्टंट आयडेण्टिफिकेशन सापडलं अणि मग इतिहास घडला असं त्या मानतात. माझ्या जवळ जवळ 300 चित्रपटांत मी एक चित्रपट तरी वेगळे करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला, पण रसिकांना मी ट्रजिडी क्वीन म्हणूनच हवी होते.
अलका कुबल तंबू क्वीन कशी झाली ?
– पुन्हा उभं राहायचं ठरवलं अणि मी स्वतः निर्माती झाले. पहिला चित्रपट, स्वतःचे पैसे अणि खूप टेन्शन यातून माझे आधीचे चित्रपट जत्रांच्या तंबू थिएटर्समध्ये प्रचंड लोकप्रिय होते हे माहीत होतं म्हणून स्वतः तिथे गेले. ते विश्व महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेलं कसं आहे हे अनुभवलं. एरवी चित्रपटगृहात न येणारा प्रेक्षकवर्ग तिथे असतो हे बघितल्यावर मग मी जत्रांचा सपाटा सुरू केला. संध्याकाळी आणि रात्री तंबूतल्या शोसाठी स्वतः हजर राहायचे अणि त्यानंतर रात्री ड्रायव्हिंग करून सकाळी पुन्हा शॉटसाठी कॅमेऱयासमोर उभी राहायचे. तंबूतल्या शिनेमातून खूप कमावलंदेखील. पैशापेक्षा त्या मातीतल्या रसिकांचं प्रेम, प्रतिसाद मिळालं मला तिथे.
वेगळं करण्याची इच्छा असूनही मग असे चित्रपट का केले?
– कलाकारालाही गरजा असतात, आणि गरजांचे प्राधान्य असते. प्रॅक्टिकॅलिटी असते. आपल्या उमेदीच्या काळात सगळय़ांचीच स्वप्नं असतात. एक आपलं स्वतःचं घर हवं, बाकी सोयी हव्यात अणि ते मिळवण्यासाठी साधनं जमवावी लागतात. आपण जे कार्य करत असू त्यात संघर्ष करत राहणं हे सत्य जगात कुणालाही चुकलेलं नाही. सगळय़ांचं सत्य हेच असतं. तेच माझंही होतं. अणि हेचं भावनिक भूमिकांमधलं यश मी स्वीकारलं.
पंधरा वर्षं राज्य करून तुम्ही मधल्या काळात जरा स्लो डाउन झालात… टीव्हीमुळे ?
– 2007 साली माझा एक ऑक्सिडेंट झाला. पाठीची शस्त्रक्रिया झाली, मणक़ेरिप्लेक्स केले गेले. माझं वजन खूप वाढलं. लोक मला बोलू लागले की, काय तुम्ही सेलिब्रिटी असून वजन कंट्रोल करत नाहीत वगैरे. पण कारणं कुणाला अणि किती सांगणार. म्हणजे पुन्हा जे माझ्या सिनेमातून होत होतं तेच घडत होतं. माझे चित्रपट समाजाचा आरसा होते ते असे. सगळय़ांच्या आयुष्यात जे घडतं तेच.
अणि मग हे सर्वच जणू बंद केलंत…
– कारण कंटाळा आला. तेच तेच सातत्याने करत का राहायचं? डिजिटल माध्यमांमुळे बऱयाच गोष्टी लोप पावू लागल्यात. सुदैवाने मला आता बरीच वेगळय़ा धाटणीची प्रोजेक्टस् करायला मिळताहेत. आपला मराठी सिनेमाही बदलतोय. सलील कुलकर्णी, समीर विद्वांस यांसारखी मंडळी इमेजव्यतिरिक्त कास्टिंग करायला धजावताहेत. धुरळा, आनंदी गोपाळसारखे सिनेमे आहेत. मग मीही वेगळं करण्याचा, प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला तर चांगलंच आहे की.
डिजिटल माध्यमांचं म्हणाल तर तुम्ही मोजक्याच मालिका केल्यात…
– हो! खरं तर सासू-सुनांच्या दुष्टचक्रातल्या मालिकांमध्ये मी अगदीच कम्फर्टेबली बसले असते, पण मीच नाही म्हटलं. संपूर्ण करीयर सासूसुनांच्या कथानकांमध्ये छळ, काबाडकष्ट दाखवण्यात गेलं. नवीन माध्यमात काही तरी वेगळं करायची इच्छा आहे. नवीन दिग्दर्शक एक्सपेरीमेण्ट करायला तयार आहेत. हे खूप चांगलं आहे.
आणि म्हणून आता बाज बदलून डायरेक्ट अबाउट टर्न करुन जत्रा टु हास्यजत्रा…
– नाही, नाही… मी आधी त्यांना नाहीच म्हटलं होतं. माझ्या इमेजमुळे प्रोग्रॅमला फरक पडेल की काय ही भीती होती. पण सचिन गोस्वामी अणि सचिन मोटे यांनी मला कन्व्हिन्स केलं की, इथे विनोदाचे चाहते हवेत. विनोद समजायला विनोदबुद्धी लागते. ती हवी. अणि मग मी तयार झाले. मकरंदपासून सगळय़ांनी मला इथे सांभाळून घेतलं. हा कार्यक्रम करताना मला अत्यंत आनंद मिळतोय. आता मी खऱया अर्थाने कात टाकली आहे असं मला वाटतंय.
























































