
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘अयोध्येतील रामजन्मभूमीचा प्रश्न अंतिम निर्णयाच्या मार्गावर आहे. रामजन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरु झाली आहे. हे प्रकरण येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये निकालात निघेल. आता ती वेळ आली असून आम्ही वाट पाहात आहोत’, असे वक्तव्य सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.
अयोध्येतील रामजन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारपासून दररोज सुनावणी सुरु झाली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील संविधान पीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली मध्यस्थता समिती कोणत्याही निष्कर्षांवर पोहचली नसल्याने आजपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत निर्मोही आखाड्याने बाजू मांडण्यास सुरुवात केली. तसेच याप्रकरणी प्रश्नोत्तरेही झाली. वादग्रस्त जागेवर मशीद होती, असा दावा करण्यात येत आहे. त्या जागेवर मशीद होती, याचे पुरावे सादर करा असा आदेशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत.
Bhaiyaji Joshi, RSS: I think Ram temple issue is on its way to a solution, the way Supreme Court has decided to give it a day-to-day hearing until a decision is reached, we feel that it will be solved in the coming 2-3 months. Now that we have reached this stage, we should wait. pic.twitter.com/K6aFIyPbVj
— ANI (@ANI) August 6, 2019
























































