
भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी यंदाचा दहीहंडी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगली परिसरातील पूरग्रस्तांना सहाय्यता करण्यासाठी या वर्षी दहीहंडी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती राम कदम यांनी दिली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणात यंदा भिषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे राम कदम यांनी यंदाचा दहीहंडी कार्यक्रम रद्द केला आहे. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. ‘कोल्हापूर आणि सांगली भागातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी यंदाचा दहीहंडी सोहळा रद्द करण्यात येत आला आहे. सर्व रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे’, अशी माहिती राम कदम यांनी दिली. यासह इतरही सर्व आयोजकांनी सोहळा रद्द करावा अन्यथा साधेपणाने साजरा करत सर्व रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये द्यावी, अशी विनंतही त्यांनी केली आहे.
गेल्या वर्षी झाला होता वाद
राम कदम यांनी गेल्यावर्षी आयोजित केलेला घाटकोपरमधील दहीहंडीचा कार्यक्रम चांगलाच वादात सापडला होता. दहीहंडी कार्यक्रमादरम्यान बोलताना राम कदम यांनी जीभ घसरली होती. ‘एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’ असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.
कोल्हापुर सांगली परिसरातील पुरग्रस्ताना सहायता करण्यासाठी ह्या वर्षी दही हंडी सोहळा रद्द करण्यात येत असून .. सर्व रक्कम पुरग्रस्ताना देण्यात येणार आहे . इतरही सर्व आयोजकनी सोहळा रद्द करावा अन्यथा साधेपनाने करत सर्व रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधि मधे द्यावी
— Ram kadam (@ramkadam) August 15, 2019
1/2 सर्व रक्कम पुरग्रस्ताना देण्यात येणार आहे . इतरही सर्व आयोजकनी सोहळा रद्द करावा अन्यथा साधेपनाने करत सर्व रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधि मधे द्यावी . नम्र निवेदन !
आमदार राम कदम— Ram kadam (@ramkadam) August 15, 2019



























































