
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता अटलजींच्या राजकीय, सामाजिक, जीवनातील विविध पैलू उलगडून दाखविणारा ‘आठवणीतील अटलजी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, खासदार गिरीश बापट सहभागी होणार असून सुधीर गाडगीळ मुलाखत घेणार आहेत, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
























































