गुणवत्ता वाचवा, देश वाचवा! अति आरक्षण थांबवा!! बीडमध्ये विराट मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अतिआरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या होत आहे, गुणवत्ता वाचली तर देश वाचेल..’ असे घोषवाक्य हातात घेऊन हजारो चिमुकले रस्त्यावर उतरले. अति आरक्षणाच्या विरोधात बीड मध्ये निघालेल्या मूक मोर्चा ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बीड मध्ये आज अति आरक्षणाच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला, बालाजी मंदिरापासून निघालेला हा अति आरक्षण विरोधी मोर्चा डॉ बाबासाहेब अंबेडकर, सुभाषरोड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. अति आरक्षणामुळे गुणवत्ता मृत्यू पावत आहे. सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या मागणीसह मूकमोर्च्यामध्ये हजारो विद्यार्थी, पालक आणि बुद्धिजीवी लोक सहभागी झाले.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा मार्गस्थ होत होता.

अति आरक्षण, देशाचे भक्षण असा टोप्या घालून विराट मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून अति आरक्षण विरोधी नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भावी पिढी आणि गुणवत्ता वाचवायची असेल तर आरक्षणाबाबत पुनर्विचार झाला पाहिजे. हीच मागणी मोर्चे कराची होती या मोर्चामध्ये हजारो चिमुकले, विद्यार्थ्यांसह, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक, सहभागी झाले होते.