गणपती पोहोचले, परंतु चाकरमानी अडकले गाडीत; कोकण रेल्वे तब्बल 20 तास उशिरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेश चतुर्थीच्या दिवशी कोकणात घरोघरी गणपती विराजमान झाले. परंतु काल मुंबईहून गणपतीसाठी निघालेले चाकरमानी अजून कोकणात पोहोचले नाहीत. कोकण रेल्वेच्या गाड्या 20 तास उशिरा धावत असल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले आहेत.

कोकण रेल्वेतील पोरबंदर ही 11 तास उशिरा धावत आहे, तर कोकणकन्या दोन तास 55 मिनिटे उशिराने धावत आहे.  तुतारी एक्सप्रेसही पाऊणे दोन तास उशिरा धावत असल्याचे चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे.

तसेच पुणे मडगाव गाडी तीन तास 45 मिनिटे, सावंतवाडी गणपती विशेष गाडी 2 तास 30 मिनिटे तर नेत्रावती एक्सप्रेस तब्बल 6 तास उशिराने धावत आहे.