आदित्य ठाकरेंची आपात्कालीन कक्षाला भेट, परिस्थितीची घेतली माहिती, मुंबईकरांना केले आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aaditya-thackeray-press-meet

शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ‘मंगळवार-बुधवार या दोन दिवसांत संपूर्ण सप्टेंबर महिन्याचा पाऊस पडल्याने मुंबईत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी, डॉक्टर्स यांना अॅलर्ट करण्यात आले आहे. पंप सुरू असल्याने पाणी ओसरण्यास मदत होत आहे. एनडीआरएफच्या टीम्स ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या असून मिठी नदीच्या काठावरील धोकादायक भागात राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हटवण्यात आले आहे’.

दरम्यान, काही भागात पावसाचा जोर ओसरल्याने दिलासा मिळाला आहे. मुंबई पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सतत कार्यरत आहेत. तसेच पुढील 24 तास आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन देखील त्यांनी मुंबईकरांना केले आहेत.