
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी शिरले आहे. अर्जुना आणि कोदवलीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी जवाहर चौकात शिरून परिसर जलमय झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 100.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाच दिवस कोकणात पावसाचा जोर कायम रहाणार असून किनारपट्टीवरून ताशी 55 किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.


























































