
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने न्यूझीलंडविरुद्ध सलग चार चेंडूवर चार विकेट्स घेतल्या आहेत. पल्लेकेलेमधील टी-20 लढतीत मलिंगाने ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूवर चार विकेट्स घेण्य़ाचा अनोखा विक्रम मलिंगाच्या नावावर जमा झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 लढतीत डावाच्या तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मलिगांने मुनरोला बाद करत टी-20म मधील 100 बळींची नोंद केली. यानंतर लागोपाठच्या तीन दोन चेंडूवर रुदरफोर्ड आणि ग्रँडहोमला माघारी धाडत हॅटट्रीक नोंदवली. षटकाच्या अखेरच्या चेंडूवरही मलिंगाने रॉस टेलरला शून्यावर बाद करत सलग चार बळींची नोंद केली.
And Ross Taylor goes!
HE’S GOT FOUR IN FOUR!
It’s not even the first time he’s done this! #SLvNZ https://t.co/ruvS6ITPLC
— ICC (@ICC) September 6, 2019




























































