नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या महिलेचा विहीरीत पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील 24 वर्षीय महीला शुक्रवारी सकाळी नैसर्गिक विधीसाठी गेली असता गावाशेजारील विहीरीत पडून तिचा मृत्यू झाला. नातेवाईकाच्या माहितीवरुन पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आन्वा येथील कविता विष्णू सावळे ही 24 वर्षीय महिला शुक्रवारी सकाळी 8 वाजता नैसर्गिक विधीला जाते म्हणून घराबाहेर गेल्या. परंतु दुपारी 12.30 वाजले तरी घरी नाही आल्या म्हणून घरच्यांनी शोध घेतला असता गावाशेजारी केशव राधाकृष्ण भाले यांच्या शेतातील विहीरीत त्याच्या मृतदेह आढळला. ही माहिती नातेवाईक ज्ञानेश्वर आनंदा बोराडे यांनी दिली. त्यावरून पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, पोलीस नाईक प्रकाश शिनकर, पोलीस शिपाई सुरेश डुकरे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतदेह विहिरीबाहेर काढून आन्वा येथे शवविच्छेदन करुन नोतवाईंकांकडे देण्यात आला. पुढील तपास पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस करत आहे.