
रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे सरपंचपदाचे उमेदवार प्रकाश पाथरूड विजयी झाले. तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी सांगितले की, हा विजय म्हणजे आमदार सदानंद चव्हाण यांच्या संयमी नेतृत्वाचा आणि सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे. ज्यांनी या प्रक्रियेत मोलाचं सहकार्य केले, त्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले.
आमदार सदानंद चव्हाण यांनी नवनिर्वाचित सरपंच प्रकाश पाथरूड यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी खास अभिनंदन केले. आपल्याकडून लोकांच्या नेहमीच वेगळ्या अपेक्षा आहेत. त्याचा विचार करुन संयम आणि एकजुटीने काम करा. गावातील ग्रामस्थांना आपल्या कार्यपद्धतीचे वेगळेपण दाखवूया. मी कायम तुमच्यासोबत आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी शहरप्रमुख उमेश सकपाळ, विभागप्रमुख शशिकांत कासार, उपविभागप्रमुख विजय (बाबू) शिर्के, शिवसेना गटनेते विश्वनाथ फाळके, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, उपविभागप्रमुख यशवंत लाड, रमेश (बाळू) शिंदे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.


























































