फिरोजशहा कोटला आता ‘अरुण जेटली’ स्टेडियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियम आता ‘अरुण जेटली स्टेडियम’ म्हणून ओळखले जाणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) यांच्याकडून गुरुवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये फिरोजशहा कोटला स्टेडियमला माजी दिवंगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात आले. तसेच या स्टेडियममधील नवीन पॅव्हेलियन स्टॅण्डला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे. याआधी बिशनसिंग बेदी व मोहिंदर अमरनाथ या खेळाडूंचे नाव स्टेडियममधील स्टॅण्डला देण्यात आले होते. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विराट कोहलीने आपल्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, 2001 साली याच मैदानावर हिंदुस्थानी संघ झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळत होता. माझे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी मला दोन तिकिटे दिली होती. मी याच स्टँडवर बसून सामना पाहत होतो. त्यावेळी मी जवागल श्रीनाथ यांचा ऑटोग्राफही घेतला होता. त्या प्रसंगानंतर आता याच मैदानावर माझा सत्कार होणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.