यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा! आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आदित्य ठाकरे यांना आशीर्वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aditya-thackeray-appasaheb

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी व आदित्य ठाकरे यांच्यात स्वच्छता, वृक्ष संवर्धन व प्लास्टिक बंदी संदर्भात चर्चा झाली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आदित्य ठाकरे यांचे पुष्पगुच्छ, शाल, छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पमूर्ती देऊन स्वागत केले आणि तुमच्या कार्यात नक्की यश मिळेल, यशस्वी व्हा, किर्तीवंत व्हा असे आशीर्वाद दिले. सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.

जन आशीर्वाद यात्रा अलिबागमध्ये दाखल झाली आहे. शिवसेना नेते, युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सकाळी पिरांचे देऊळ येथे जाऊन थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. देशात आपल्यामार्फत होत असलेले स्वच्छतेचे व झाडे लावण्याचे काम हे कौतुकास्पद असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटले. यावेळी विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आदित्य ठाकरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. माजी आमदार सचिन अहिर यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.