
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीतील रोझ अव्हेन्यू न्यायालयाने 14 दिवसांची वाढ केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने चिदंबरम यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
INX Media (CBI) case: A special court in Delhi extends Congress leader P Chidambaram’s judicial custody till 3rd October. pic.twitter.com/NF01ErHmNp
— ANI (@ANI) September 19, 2019
Delhi: Congress leader P Chidambaram has been brought to Rouse Avenue Court in connection with INX media case, at the end of his judicial custody. pic.twitter.com/QN2LsRehZR
— ANI (@ANI) September 19, 2019
आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पी. चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून ते सीबीआयच्या कोठडीत आहेत. 5 सप्टेंबर रोजी त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना रोझ अव्हेन्यू न्यायालया हजर करण्यात आले होते. त्यावेळी चिदंबरम यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी त्यांच्या कोठडीत वाढ न करण्याची मागणी केली होती. तर सीबीआयने चिदंबरम यांची कोठडी वाढवण्याची मागणी केलेली. न्यायालयाने सीबीआयच्या मागणीनुसार चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.





























































