वॉशिंग्टनमध्ये अज्ञाताकडून बेछुट गोळीबार, 1 ठार तर पाच जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी इथे अज्ञाताकडून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 1 जण ठार तर पाच जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. हा गोळीबार व्हाईट हाऊसपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर झाला आहे.

गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. मध्यरात्री गोळ्यांच्या आवाजाने स्थानिक नागरिक हादरले. हा हल्ला कुणी केला, किती हल्लेखोर होते, याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. स्थानिक पोलिसांनी गोळीबार झालेल्या परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे.