सुप्रिया सुळे यांना डेंग्यूचे निदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व नेत्या सुप्रिया सुळे या सध्या आजारी असून त्यांना डेंग्यू झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सुप्रिया यांनी स्वत: याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.

‘मला डेंग्यूचे निदान झाल्यामुळे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे, परंतु मदत आणि पुनर्वसन उपाययोजना वेगात करण्यासाठी मी आणि माझी टीम, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क आणि समन्वय साधत आहोत. पुण्याच्या आयुक्तांनी देखील मदतीचे आश्वासन दिले आहे’, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.