
कोकण रेल्वेच्या अंजनी स्टेशनवर नवीन लूप लाइन कार्यान्वित करण्याचे काम होणार असल्याने ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत खेड चिपळून रेल्वे स्थानकादरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
तीन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने या दिवशी मडगाववरून सुटणारी मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी 13:45 वा. म्हणजे 1:30 तास उशिरा सुटेल. दरम्यानच्या काळामध्ये पुढील गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामध्ये मत्स्यगंधा एक्सप्रेस, दादर रत्नागिरी पॅसेंजर, एल टी टी कोचुवेली एक्सप्रेस, सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस तसेच मडगाव मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस यागाड्यांचा समावेश असेल. काही गाड्या काही काळाकरता थांबवल्या जातील अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.


























































