काँग्रेसला तगडा धक्का, सहा आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे 6 विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबईमध्ये गरवारे क्लबमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा

विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून मतदानाची आणि तारखांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले. अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी मुलाखती दिल्या, तर काहींनी अर्ज भरण्याची तयारीही केली. याच दरम्यान रविवारी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना तिकीट मिळाले आहे, मात्र काहींची तिकीट कापण्यातही आले आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनी बंडखोरी करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

तावडेंचा सल्ला झुगारून चव्हाण विधानसभेला नशीब आजमावणार, वाचा सविस्तर…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून उमेदवारी, पण…

काँग्रेसने राज्यातील 51 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये नावे नसलेल्या सहा आमदारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची यादी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची बोलले जात आहे. या विद्यमान आमदारांमध्ये असलम शेख, राहुल बोन्द्रे, काशीराम पावरा, डीएस अहिरे, सिद्धराम म्हेत्रे आणि भारत भालके यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.