हीच ती वेळ! निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचे ट्वीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aaditya-thackeray

वरळीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. विजय संकल्प मेळाव्यानंतर त्यांनी सिद्धिविनायाचे दर्शन घेतले. निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करून ‘हीच ती वेळ’ असल्याचे म्हटले आहे.

Photo – आदित्य ठाकरे यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

जनतेची सेवा करण्यासाठी, सर्व जनतेचा आदेश मानत, आज मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सर्व भेदभाव दूर करुन, नवा महाराष्ट्र घडवण्याची ‘हीच ती वेळ’! असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

विजय संकल्प मेळाव्यातील आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • हा जो लढण्याचा निर्णय मी घेतला आहे तो स्वत:साठी नाही आहे, मी जनतेच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे
  • हीच ती वेळ आहे बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडविण्याची, हीच ती वेळ आहे कर्जमुक्त महाराष्ट्र घडविण्याची, हीच ती वेळ आहे प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडविण्याची, हीच ती वेळ आहे एक सुजलाम् सुफलाम्, हिरवागार, भगवा, सुशिक्षित आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याची
  • जर आपली परवानगी असेल, विद्यमान आमदारांची परवानगी असेल आणि शिवसैनिकांची परवानगी असेल तर मी शिवरायांच्या साक्षीने, सर्व महापुरुषांच्या साक्षीने, माझ्या आजी आजोबांच्या साक्षीने मी निवडणुक लढविणार ही घोषणा करतो