हनी ट्रॅप- पार्टी ते बेडरूम.. असे बनवले जायचे अश्लील व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशच्या हनी ट्रॅप प्रकरणाने राजकीय वर्तुळ चांगलंच ढवळून निघालं आहे. मध्य प्रदेशच्या जे नेते, अधिकारी आणि मंत्र्यांचे अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले, त्यांच्याकडून कोटींची खंडणी उकळली गेली आहे. एसआयटीच्या तपासात यातील साडेतीन कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत आणि अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस तपासात या व्हिडीओंबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. हनी ट्रॅपमधील आरोपी तरुणी विविध क्लब्समधून आपलं सावज शोधत असत. त्याखेरीज हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये तसंच लेट नाईट पार्ट्या यांमध्येही त्यांचा वावर होता. तसंच बऱ्याचदा शनिवारी रात्री हायवे पार्टी नावाची पार्टीही भोपाळ-इंदूर फोरलेन रोडवर होत असे. त्याखेरीज सीहोर बायपासच्या रेसॉर्ट आणि मोठी हॉटेल्स तसंच फार्म हाऊसमध्येही या पार्ट्या ठेवल्या जात. या पार्ट्यांमध्ये मोठमोठे नेते तसंच आयपीएस ऑफिसर्सना बोलावलं जात असे.

या आरोपी तरुणी पार्टीला आलेलं सावज हेरत आणि त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढत आणि त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जात. त्यांच्या अय्याश वृत्तीचा गैरफायदा घेऊन त्यांचा व्हिडीओ बनवत. यासाठी लिपस्टिक कव्हर, गॉगल, चश्मे यांच्यातल्या छुप्या कॅमेऱ्याचा वापर केला जात होता. व्हिडीओ शूट झाल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं.